Posts

Showing posts from July, 2021

एका नाक्याची ऐतिहासिक समृद्धता!

Image
मुंबई बंदर म्हणून उदयास यायच्या आधी मुंबईपासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर एक आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर अस्तित्त्वात होते हे किती जणांना माहित आहे? इसवीसन पूर्व कालखंडापासून सतराव्या शतकापर्यंत जगाच्या नकाशावर दिमाखात उभे असलेले पश्चिम किनारपट्टीवरील असे हे एकमेव ठिकाण होय. ज्याकाळी संजान-चिंचणी हे महामुंबईचे उत्तर टोक होते त्याकाळी दक्षिण टोकाचा मान या बंदराकडे होता. मुंबई बंदराच्या निर्मितीनंतर आजवर कधीही जितकी जहाजे या बंदराने पाहिली नसतील त्याच्या कितीतरी पटींनी अधिक जहाजांचे आदरातिथ्य या बंदराने केले आहे. एव्हाना काही लोकांनी जागेचा अंदाज बांधला असेल आणि तो अंदाज नक्कीच 'अलिबाग' हा असेल. पण हा अंदाज चुकीचा आहे. पर्यटक अलिबाग आणि मुरूड-जंजिराला आवर्जुन भेट देतात पण या प्रवासाच्या दरम्यान येणारा एक नाका कायम दुर्लक्षित राहतो. हा नाका म्हणजे 'चौल नाका'. पण चौल हे केवळ नाक्यापुरते मर्यादित नसून एकेकाळचे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर होते, याची अनेक जणांना माहिती नसते. म्हणूनच चौलला आवर्जुन भेट द्यायला हवी. दोन हजार वर्षापूर्वी भारतीय उप...
Image
हंबीरराव - मुंबईचा अप्रसिद्ध शासक. मुंबईचा इतिहास म्हटलं तर आपण ४००-५०० वर्षच मागे जातो कारण मुंबईची घडण ब्रिटिशांच्याच काळात झाली. पण या आधी काय? आधीच्या काळाबद्दल दंतकथा अशी की मुंबईत बिंब(रामचंद्र यादवाचा मुलगा) नावाचा राजा होता ज्याची राजधानी माहीम(महिकावती) होती. परंतु या कथेला महिकावतीची बखर सोडल्यास कोणताही आधार नाही. ही पार्श्वभूमी सांगण्याची गरज आहे कारण पुढील माहितीची सुरवात याच गोष्टीवरून होते. काही काळापूर्वी पुरातत्व शास्त्रज्ञांना(डॉ. कुरुश दलाल) एक शिलालेख हाती लागला. तो शिलालेख नांदगाव(अलिबाग जवळ) मध्ये चोरगे कुटुंबच्या घरी वर्षोनुवर्षे होता. तो त्यांना ६० वर्षांपूर्वी विहीर खणताना मिळाला होता. या शिलालेखाविषयी आणि हंबीररावाविषयी मी इथे लिहीत आहे. शिलालेख या शिलालेखावरील बहुतांश मजकूर मराठीत(यादवकालीन मराठी) आहे. काही मजकूर संस्कृत आणि फारसी शब्दातही आहे. मजकुराची लिपी देवनागरी आहे. १. मजकुरानुसार फिरोजशाह तुघलकाच्या हाताखाली महाराजाधिराज हंबीरराव ठाणे,कोंकण आणि बिंबाचे माहीम या ठिकाणी राज्य करीत होता. २. शिलालेखावर कोरलेल्या हंबीररावाचा पंतप्रधान (पंतप्रधानाला शब्द - स...
अश्मक अश्मक  या  अस्सक  प्राचीन भारत के 16  महाजनपदों  में से एक था। यह एक मात्र महाजनपद था जो विंध्य पर्वत के दक्षिण में स्थित था। आधुनिक काल में इस प्रदेश को  महाराष्ट्र  कहते हैं। यह अवन्ति का एक समीपवर्ती राज्य था। प्रारंभ में अस्सक गोदावरी के तट पर बसा हुआ था और पोतलि अथवा पोत इनकी राजधानी थी। [1] सन्दर्भ  ↑   नाहर, डॉ रतिभानु सिंह (1974).  प्राचीन भारत का राजनैतिक एवं सांस्कृतिक इतिहास . इलाहाबाद, भारत: किताबमहल. पृ॰ 112.   पाठ "editor: " की उपेक्षा की गयी ( मदद );  |access-date=  दिए जाने पर  |url= भी दिया जाना चाहिए  ( मदद )

नांदेड जिल्हा – एक दृष्टीक्षेप

Image
जिल्हा परिषद नांदेड. इतिहास नांदेड जिल्हा – एक दृष्टीक्षेप महाराष्ट्र राज्यात दक्षिण टोकाला तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत नांदेड जिल्हा वसलेला आहे. “नांदेड” या नावाचा उगम “नंदी-तट” या शब्दामधून झालेला असून, “नंदी” म्हणजे भगवान श्री शंकराचे वाहन आहे आणि “तट” म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ, नंदीने गोदावरी नदीच्या किनार-यावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे, शीख धर्माचे गुरु श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांनी सन १७०५ मध्ये या ठिकाणी आपला देह ठेवला. नांदेड हे सन १७२५ मध्ये हैद्राबाद संस्थानाचा हिस्सा झाले आणि १९४७ नंतर भारताच्या स्वातत्र्यानंतरही निजाम संस्थाने आपले स्वतंत्र अस्तित्व राखल्याने नांदेड हैद्राबाद संस्थानाचाच हिस्सा बनून राहीले. हैद्राबाद संस्थानाविरुद्ध केलेल्या भारत सरकारच्या पोलीस कारावाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले.     प्राचीन राजवंश : इसवीसन पुर्व सहाव्या शतकाच्या सुमारास महाराष्ट्रातील विविध प्रदेश अश्मक, कुंतल, मलक, अपरांता, ऋषिक नावाने संबोधिले...