संत गोविंद महाराज समाधी स्थळ,उद्धारासाठी बैठक संपन्न..
मागील ३ वर्षांपासून तालुक्यातील जनतेच्या नंबर १ पसंतीचे न्यूज पोर्टल..

संत गोविंद महाराज समाधी स्थळ,उद्धारासाठी बैठक संपन्न..
अतिक्रमण काढून,गावाचा नामोध्दार करण्यासंदर्भात सर्वानुमते चर्चा..
श्रीगोंदा दिनांक २जुलै :
ऐतिहासिक संत गोविंद महाराज यांची समाधी दुर्लक्षित,विकासासाठी जनआंदोलनाची गरज,या मथळ्याखाली दिनांक २७ जून रोजी बहुजन समता पत्रच्या (article 17)या news portal ने प्रकाशित केलेल्या,बातमीच्या अनुषंगाने,दिनांक १जुलै रोजी समाज बांधवांच्या वतीने श्रीगोंदा शनी चौक येथे बैठक संप्पन झाली.संत गोविंद महाराज यांच्या नावाने या नगरीला असलेले नाव,इतिहासाच्या पानांवरुन नामशेष कसे झाले? गतकाळात नावारूपाला आलेल्या चांभारगोंदा नावाला बदलण्याचा अट्टाहास कोणी?आणि कोणत्या उद्देशाने केला? याच्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.यासाठी,तालुक्यातून अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झाले होते.(जिल्हा परिषदेचे माजी सदस्य)अनिल ठवाळ,(सामाजिक कार्यकर्ते)मुकुंद सोनटक्के,दीपक घोडके,(भटक्या विमुक्त समाज संघटनेचे)भालचंद्र सावंत,(मातंग युवक संघटनेचे) नंदकुमार ससाणे,(बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी)सुनील ओहोळ,संतोष शिंदे,दादा ठवाळ,सह तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील बहुतांश कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते.
संत गोविंद महाराजांचे श्रीगोंदा नागरीसाठीचे योगदान ,त्यांनी चालवलेले माणुसकीचे आंदोलन यामुळे ;तत्कालीन समाज व्यवस्थेने त्यांना संत उपाधी दिली.अनेक ऐतिहासिक दस्तावेज आणि पुराव्यांच्या आधारे श्रीगोंदा साधारण १६०० साली चांभारगोंदा होते.काही दशकांपूर्वीची लोक श्रीगोंद्यास चांभारगोंदा किंवा चांभारगोंद असाच उल्लेख करीत असल्याचे याबैठकीत नमूद करण्यात आले.संत गोविंद महाराज समाधी स्थळी झालेले अतिक्रमण काढण्यात यावे.तशेच या गावचे नाव बदलून पुन्हा चांभारगोंदा करण्यात यावे.अश्या सूचना अनेकांनी यावेळी केल्या.(भटक्या विमुक्त संघटनेचे)भालचंद्र सावंत यांनी सदर प्रकरणी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून,सर्व दस्तावेज काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. समाधी स्थाळाच्या जीर्णोद्धारासाठी शासनाच्या अनेक योजना असल्याचेही या बैठकीत सावंत यांनी नमूद केले आहे.
श्रीगोंदा नगर पालिकेच्या माध्यमातून याविषयी पाठपुरावा करीत,संत गोविंद महाराजांच्या समाधी ठिकाणचा विकास करणे व आजूबाजूच्या अतिक्रमणास हटवण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यासाठी पुढाकार घेत सर्व समाजातील लोकांना एकत्र येण्याचे अनिल ठवाळ यांनी बोलताना आवाहन केले.मुकुंद सोनटक्के,सुनिल ओहोळ,नंदकुमार ससाणे,दीपक घोडके यांनीही यासंदर्भात आपले विचार नमूद केले.(चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)संजय खामकर यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे उपस्थितांना सांगितले आहे.
या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी,सोमवार दिनांक ८ जुलै रोजी शेख महंमद बाबा दर्गाह मध्ये दुपारी १२ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे नमूद बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.संत गोविंद महाराजांच्या संदर्भात आदर असणाऱ्या समाज बांधवांनी तशेच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढील बैठकीला उपस्थित राहुन विचार मांडण्याचे आवाहन याठिकाणी करण्यात आले आहे. समाधी स्थळी झालेले अतिक्रमण काढणे व गोविंद महाराजांचे नाव पुन्हा गावाला देण्या संदर्भात महत्वाची चर्चा पुढील बैठकीत करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे.
दिनांक २७ जून रोजी प्रकशित केलेली बातमी

