हरदोई, जिल्हा:- संयुक्तप्रांतांत लखनौ विभागांतील एक जिल्हा.
विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
हरदोई, जिल्हा:- संयुक्तप्रांतांत लखनौ विभागांतील एक जिल्हा. या जिल्ह्यांत बहुतेक सगळी जमीन सपाट आहे. या जिल्ह्यांतील मुख्य नदी म्हणजे रामगंगा जिल्ह्यांतील बरीच जमीन जंगल व लागवडीत न आणलेली अशी आहे. या जंगलांत गवत उंच वाढतें. जिल्ह्याची हवा सामान्यत: आरोग्यावह आहे. उन्हाळयांत जास्तीत जास्त उष्णता १०५ डिग्री असतें. येथें पाऊस सरासरीनें ३२ इंच पडतो. इ ति हा स.-या जिल्ह्याचा उल्लेख महाभारतांत व रामायण या महाकाव्यांत सांपडतो. बौद्ध काळांत व प्राचीन मुसुलमानी काळांत या जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व बिलकुल नसे. या जिल्ह्यांत मुसुलमानांचा प्रवेश प्रथम १०१९ सालीं झाली व आलतमशच्या अमदानींत हा जिल्हा पूर्णपणे त्यांच्या ताब्यांत गेला. पंधराव्या शतकांत हा जिल्हा जोनपूरच्या नव्या राज्यछत्राखालीं होता, व पुढें त्या जिल्ह्याच्या स्थानमहात्म्यामुळें त्या ठिकाणीं १५० वर्षे रणसंग्राम चालला होता. अकबर बादशहाचे वेळी हा जिल्हा व अफगाण लोक पूर्णपणें जिंकले गेले व पुढें हा जिल्हा अयोध्येच्या नवाबाच्या ताब्यांत होता, व कांहीं वेळ तो रोहिले लोकांच्या मुलुख व सुजाउद्दवला याचें राज्य ह्याच्या सरहद्दीवर होता. पुढें ज्यावेळी १८५६ सालीं अयोध्या संस्थान खालसा झाले त्यावेळी हा जिल्हा निर्माण झाला व १८५७ सालच्या बंडानंतर या जिल्ह्याचें मुख्य ठिकाण हरदोई शहर झालें. लोक वस्ती.-या जिल्ह्यांत १० शहरें व १८८८ खेडीं असून लो. सं. १०८४४१० शेंकडा ८९ लोक हिंदू व जवळ जवळ ११ लोक मुसलमान होते. येथल्या लोकांची जन्मभाषा पश्र्चिम हिंदी होय. शेतकी-या जिल्ह्यांत शेतकी उत्तम स्थितींत नसल्याचें कारण तीन प्रकारचें आहे. कांहीं ठिकाणीं जमीनीची उत्कृष्ट स्थिति, कांही ठिकाणी महापुरांमुळें जमीनीची नासाडी; व पाटबंधाऱ्यांच्या पाण्याचा अभाव. या ठिकाणीं जमीनधारीची पद्धत अयोध्या प्रांतांतल्या प्रमाणेंच आहे. शेंकडा ३१ एकर जमिनींत गव्हाची लागवड होते. बाकीच्या भागांत बाजरी, हरभरा, अरहार, तुरीच्या वगैरे डाळी, ज्वारी, तांदूळ व मका वगैरे धान्यें तयार होतात. ऊंस, कापूस हीं फारशी पिकत नाहींत. दिवसानुदिवस लागवडीस जास्त जमीन आणण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. या जिल्ह्यांत कारागिरीस फारसें उत्तेजन नाहीं. कापसाचें कापड पूर्वी हातमागावर तयार होत असे पण आतां त्या कापडास फारशी मागणी नाही.या ठिकाणीं जे चिकाचे पडदे व मेजावर टाकण्याचें कापड तयार होतें ते बरेंच प्रेक्षणीय असतें. घोंगड्या, दोर, जाळी वगैरे जिन्नस येथें तयार होतात. या जिल्ह्यांतून बाहेर जाणारा माल म्हणजे धान्य, गूळ, तंबाखू, कातडीं गुरे वगैरे होत व बाहेरून आंत येणारा माल म्हणजे यंत्रावरचे कापड, तांबे, पितळ वगैरे मीठ, कापूस व साखर हे जिन्नस होत. या जिल्ह्यांत रेल्वे सुरू झाल्यामुळें पूर्वीच्या व्यापारामुळें प्रसिद्ध असलेल्या शहरांचें महत्त्व कमी होऊन सांडिला माधवगंज व साडी हरदोई सारख्या शहरांचे महत्त्व वाढत चाललें आहे. शिक्षणाचें बाबतींत हा जिल्हा फारच मागासलेला आहे. स. १९०१ त शेंकडा १.८ लोकांनां लिहितां वाचता येत होतें. त ह शी ल.-क्षेत्रफळ ६३५ चौरस मैल. १९०१ सालीं येथील लोकसंख्या २७२१५८ होती. या तहशिलींत दोन शहरें हरदोई वगोपामी व ४७० खेडी आहेत. या तहशिलीत गोमती व साई, या नद्या वहातात. श ह र--हरदोई जिल्ह्यांत हें शहर असून या शहराची लोकसंख्या १९०३-४ सालीं १२१७४ होती. या शहराचें दोन भाग आहेत; जुनें हरदोई व नवें हरदोई. शहरांत सार्वजनिक इमारती पुष्कळ आहेत व एक प्रेक्षणीय दिवाणखाना आहे. येथें लांकडी काम प्रेक्षणीय होतें.

Comments
Post a Comment