परिंडा
विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
परिंडा- हा किल्ला अतिशय जुना व मजबुतीबद्दल प्रख्यात आहे. हा प्रथम नगरच्या निजामशाहींत होता; एके काळीं तर तो निजामशाहीची राजधानीहि होता. याच्या स्वामित्वासाठीं आदिलशाही व निजामशाही यांत नेहमीं झगडे होत. निजामशाही बुडाल्यावर हा आदिलशाहींत सामील झाला. स. १६६५ च्या सुमारास मोंगलांचा अंमल त्यावर बसला. शिवाजीनें याच्या आसपासचा सर्व प्रांत स. १६७० त लुटला. मराठयांचा डोळा या किल्ल्यावर पुष्कळ दिवसांपासून होता. हैद्राबादकर निजामाच्या कारकीर्दींत परिंडा मराठयांच्या हातीं येण्याचा २।३ वेळ प्रसंग आला पण तो कायमचा असा त्यांनां मिळाला नाहीं. हा सांप्रम निजामाच्या राज्यांत तुळजापुराजवळ उस्मानाबाद जिल्ह्यांत आहे. [पेशव्यांची बखर; जेधे शकावली.]

Comments
Post a Comment