रोहिलखंड - संयुक्तप्रांतांतील बरेली विभाग
रोहिलखंड - संयुक्तप्रांतांतील बरेली विभागाला हें नांव लावतात. परंतु त्यांत रामपूर संस्थान व नैनीताल जिल्ह्यांतील तराई परगणे हेहि भाग मोडतात. क्षेत्रफळ १२८०० चौरस मैल. तराईंत बरेंच जंगल, वाघ व रानटी हत्ती आढळतात.
प्राचीन काळीं ह्मा प्रदेशांतील कांही भाग उत्तरपांचालांत मोडत असे. पूर्वेकडील भागास काठेर म्हणत असत. काठेर शब्दाच्या मूळाबद्दल बराच वाद आहे. मुसुलमानी सत्त वाढत्या प्रमाणांत होती त्या वेळेस राठोडांनी बदौन ही आपली राजधानी केली. परंतु ह्मा भागांत नेहमीं बंडे होत असत. १४१९-२० सालीं महाबतखान सुभेदारानें बंड करून तो स्वंतत्र झाला. १४४८ सालीं अलमशहा बदौन ही आपली राजधानी केली. अकबरानें बदौन सरकार दिल्लीच्या सुभ्यांत सामील केला. तरी अफगाण लोक मधून मधून उचल खात होते, अखेर १७४० सालीं अली महमदखान रोहिलखंडचा सुभेदार म्हणून नेमला गेला. अली महमद मेल्यानंतर रहिमतखान हा अली महमदच्या मुलांचा पालक नेमला गेला. परंतु अलीचा प्रतिस्पर्धी खानबंगष यानें आपला डाव साधण्याचा प्रयत्न केला व पुन: बंडाळी सुरू झाली. अहमदशहा दुराणीच्या दुसर्या स्वारीमुळें रहिमतखानानें बराच प्रांत आपल्या ताब्यांत घेतला. त्याच वेळेस नजीबखान नांवाचा सरदार उदयास येत होता. याच्याविरूद्ध मराठे स्वारी करणार होते. म्हणून हा, रहिमतखान व अयोध्येचा नवाब सुजालउद्दौला हें त्रिकूट जमलें, व ह्मांनी मराठयांस परतविलें. १७७० सालीं ही घडी बिघडली. १७७२ साली सुजाउद्दौलानें ४० लक्ष रू. घेऊन मराठयांविरूद्ध रहिमतखानास मदत देण्याचें कबूल केलें. त्याप्रमाणें सुजाउद्दौला यानें मराठयांस हांकलून लाविले; परंतु रहिमतखानानें रूपयें दिले नाहींत. १७७२ सालांतील तह इंग्रजांच्या समक्ष झाल्यामुळें इंग्रज-सुजा यांचे रोहिल्यांशीं युद्ध झालें (१७७४) व रहिमतखान लढाईंत मेला. या मदतीबद्दल वॉरन हेस्टिंग्जला जाब द्यावा लागला होता. रोहिंल्यापैकी उरलेल्या फैजुलाखान सरदारांस रामपूर संस्थान दिलें व अयोध्येच्या नवाबानें १८०१ सालीं सर्व रोहिलखंड ब्रिटिशांच्या ताब्यांत दिलें. रोहिलखंडची लोकसंख्या सुमारे ६ कोटी असून तींत शेंकडा २८ मुसुलमान लोक आहेत.

Comments
Post a Comment