नातेंपुतें- नातेंपुतें हें पुणें-सोलापूर सडकेवर माळशिरसच्या पूर्वी खेडें
विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
नातेंपुतें- नातेंपुतें हें पुणें-सोलापूर सडकेवर माळशिरसच्या पश्चिमेस ५ मैलांवर आहे. हें पूर्वी खेडें असून बहामनी राजांचा दिवाण मलिकसुंदर यानें या गांवास उर्जितावस्थेस आणलें असें सांगतात. या गावीं गाणार्या नायकिणींचीं घरें बरींच आहेत. येथें बुधवारी मोठा बाजार भरतो. येथें दोन महादेवाची देवळें व दोन तळीं आहेत. येथून जवळच गुप्तलिंग नांवाचें हिंदूंचें पवित्र क्षेत्र आहे व त्याजवळच ज्योतिर्लिंगापैकीं शिखर-शिंगणापूर हें पवित्र महादेवाचें स्थान आहे. [बॉम्बे ग्याझे. पु. २०.]

Comments
Post a Comment