रोहटस - पंजाब, झेलम जिल्ह्याच्या झेलम तहशिलींतील एक किल्ला.

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रोहटस - पंजाब, झेलम जिल्ह्याच्या झेलम तहशिलींतील एक किल्ला. बादशहा शेरशहानें हा बांधला. याला ४० लक्ष रू. खर्च आला याचा घेर २॥ मैल असून भिंती ३० फूट रूंद असून ३०-३५ फूट उंच आहेत. याशिवाय याला ६८ बुरूज व बारा दरवाजे आहेत; त्यांपैकी सोहल दरवाजा फारच उत्तम आहे.

(२) बंगाल, शाहाबाद जिल्ह्यांतील सस्त्राम विभागांतील एक किल्ला. ११०० च्या सुमारास हा किल्ला प्रतापधवलच्या ताब्यांत होता. १५३९ त तो शेरशहानें घेतला. पुढें अकबरचा हिंदू सेनापति मानसिंग येथें राहत असे. १७६४ त तो ब्रिटिशांच्या हांती आला. याचा घेर सुमारे २८ मैल आहे.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे