मॅगडेबर्ग-त्रशियन प्रांताचें राजधानीचें शहर

 मॅगडेबर्ग- बर्लिनच्या नैर्ॠत्येस ८८ मैलांवर मुख्यतः एल्बनदीच्या डाव्या तीरावर वसलेलें जर्मनींतील सॅक्सनी नांवाच्या त्रशियन प्रांताचें राजधानीचें शहर. यास पहिल्या प्रतीची तटबंदी असून हें जर्मनींतील प्रमुख व्यापारी शहरांपैकीं एक आहे. येथून हॅम्बर्ग, कॅसेल, ब्रन्स्विक व लिप्झिग या शहरांकडे आगगाडीचे फांटे जातात. लोकसंख्या (१९१९) २८५८५६. येथें नदीच्या तीरावर विहार करण्याकरितां रमणीय मार्ग काढले असून मुख्य शहराच्या दक्षिणेस एक रम्य उपवन आहे. १४ व्या शतकांतील एस्.एस्. मॉरिस आणि कॅथेरिन यांनां अर्पण केलेली क्याथेड्रल ही एक भव्य इमारत असून तिच्यांत रोमन व गॉथिक शिल्पकलांचा मिलाफ पहावयास सांपडतो. हिच्याशिवाय सरकारी कचेऱ्या, नगरभवन, न्यायमंदिर, सराफ, दोन नाटकगृहें व मुख्य रेल्वेस्टेशन या येथील ठळक ठळक इमारती आहेत. शेतकीकॉलेज, वेधशाळा, दोन उत्तम रुग्णालयें. व्यापारी शिक्षणविषयक व इतर शाळा आणि कित्येक व्यायामशाळा येथें आहेत. येथें लोखंडी कामाचे कारखाने आहेत. या ठिकाणीं आरमारी चिलखतें व इतर युध्देपयोगीं सामान तयार होतें. साखर करणें, चिकोरी, तंबाखू, हातमोजे, चाकोलेट, कृत्रिम खत, सिमेंट, रासायनिक द्रव्यें, व्हार्निश, मातीची भांडीं दारू गाळणें भट्टया आणि सुतीं व रेशमी वस्त्रें तयार करण्याचे कारखाने हे येथील उद्योगधंदे होत. साखर, चिकोरी, द्विदल धान्यें, फळफळावळ, भाजीपाला, कापड, सूत, कमावलेलें कातडें, गुरें, घोडे, लोंकर, कोळसा, पुस्तकें इत्यादि वस्तूंचा येथें व्यापार चालतो. ४ लक्ष पौंड खर्च करून एल्ब नदीवर बंदर बांधलें आहे, त्यामुळें व्यापाराची फार सोय झाली आहे. येथें जर्मन सेन्याची चवथी पलटण आहे.

''मॅगडेबर्ग सेंचरीज'' नांवाचा, प्रॉटेस्टंट धर्माच्या मताप्रमाणें लिहिलेला ख्रिस्ती धर्माचा पहिला इतिहास या ठिकाणीं १६५२ सालीं लॅटिन भाषेमध्यें लिहिला गेला. ल्यूथरला येथील शाळेंतच शिक्षण मिळालें होतं. लहानपणीं तो येथील रस्त्यांत गाऊन भिक्षा मागून आपलें पोट भरीत असे.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे