मतिआरी-हाला तालुक्यांतलें गांव.

मतिआरी- मुंबई, सिंध-हैदराबाद जिल्ह्याच्या हाला तालुक्यांतलें गांव. लोकसंख्या सुमारें सोळा हजार. येथें खाद्य धान्ये, गळिताचीं धान्यें, रेशीम कापड व साखर या जिन्नसांचा व्यापार चालतो. हें गांव इ. स. १३३२ मध्यें वसलें असूनयेथें इ. स. १८०३ मध्यें बांधलेली जाम मशीद आहे. इ. स. १८५८ मध्यें येथें म्युनिसिपालिटी स्थापन करण्यांत आली.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे