हळ्ळेबिड- म्हैसूर संस्थानांत हसन जिल्ह्यांत हें खेडेगांव आहे

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद    
            
हळ्ळेबिड- म्हैसूर संस्थानांत हसन जिल्ह्यांत हें खेडेगांव आहे. याचें मूळचें नांव हळ्ळेबिडु (अर्थ जुनी राजधानी) असें होतें. व याच ठिकाणीं होयसळ राजांची राजधानी द्वारावतीपुर किंवा द्वारसमुद्र (पहा) होती. हें शहर प्रथम १३१० सालीं मलिक काफरनें जिंकून तेथील अपार संपत्ती हरण केली. मुसुलमानांची दुसरी स्वारी या शहरावर होऊन या शहराचा पूर्ण नायनाट झाला, तरी तेथील इमारती अजून प्राचीन वैभवाची साक्ष देतात. होयसळेश्वर व केदारेश्वर या देवळांच्या इमारती अजूनहि प्रेक्षकांचें मन वेधतात.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे