फिरोझाबाद- संयुक्त प्रांतांतील आग्रा जिल्ह्याची एक ईशान्येकडील तहशील
विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
फिरोझाबाद- संयुक्त प्रांतांतील आग्रा जिल्ह्याची एक ईशान्येकडील तहशील. क्षेत्रफळ २०३ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ११५७८४. ही तहशील यमुनेच्या उत्तरतीरावर असून हींतून सिसी व सेनगर ह्या दोन लहान नद्या वहातात. हींत खेडीं १९१ आहेत.
गांव.- फिरोझाबाद तहसिलीचें मुख्य ठिकाण हें ईस्ट इंडियन रेल्वेवर आहे. लोकसंख्या (१९११) १३५७१. हा गांव फार प्राचीन आहे. याचा नाश करण्यांत आला होता पण अकबराच्या हुकुमावरून मलिक फिरोज नामक खोजानें हा फिरून वसविला. येथें एक जुनी मशीद असून कांहीं देवालयें आहेत. म्युनिसिपालिटीची स्थापना १८६९ सालीं झालीं.
Comments
Post a Comment