परडा जमीनदारी- मध्यप्रांत, भंडारा जिल्हा.
विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें
परडा जमीनदारी- मध्यप्रांत, भंडारा जिल्हा. साकोली तहशील आणि खैरागड संस्थान यांच्या दरम्यान ही जमीनदारी आहे. क्षेत्रफळ ३८ चौरस मैल. खेडीं ७ असून बराच भाग जंगलमय आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीं ही जमीनदारी चिमणाजी भोंसले ह्यांनीं ओरिसामध्यें जय मिळवून परत आल्याबद्दल आपणाबरोबर आलेल्या कारू गोंड यास दिली. हिची लोकसंख्या ३००० व उत्पन्न ५००० रुपये आहे.

Comments
Post a Comment