रोहरी - मुंबई, सिंधप्रांतांत सक्कर जिल्ह्यांतील एक तालुका


रोहरी - मुंबई, सिंधप्रांतांत सक्कर जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ १४९७ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) ७७३१०. रोहरी तालुक्यांत तांदुळ, ज्वारी व गहूं हीं मुख्य पिकें होतात.
रोहरी हें तालुक्याचें मुख्य शहर आहे. याची लोकसंख्या १०००० आहे. हें शहर प्रथम सय्यद रूकनुद्दीन शहा यानें १२९७ सालीं वसविलें असें म्हणतात. याच्या उत्तरेस नारा कालव्याचें मुख आहे. येथें मशिदी पुष्कळ आहेत; त्यांतील जुम्मा मशीद व इदगा मशीद ह्मा मुख्य आहेत. याशिवाय वारमुबारिक म्हणून एक प्रसिद्ध इमारत आहे. ही इमारत १७४५ सालीं महमदाच्या दाढीचा केंस ठेवण्याकरिता बांधली गेली. हा केंस रत्‍नजडित सोन्याच्या डबीत ठेवला असून दरवर्षी मार्च महिन्यांत ही डबी उघडतात. येथें १८५५ साली म्युनिसिपालिटी स्थापन झाली. रोहरीच्या समोर सिंधूनदावर ख्वाजा खिझर नांवाचें बेट आहे.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे