मेहकर
मेहकर, ता लु का व गां व.-वर्हाड, बुलढाणा जिल्हा. तालुक्याचें क्षेत्रफळ १०२७ चौरस मैल व लोकसंख्या सुमारें १४२०००. यांत ३१३ खेडीं व मेहकर नांवाचें एक गांव आहे. मेहकर गांव तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. लोकसंख्या सुमारें पांच हजार. हें गांव अकबरबादशहाच्या कारकीर्दीत एका “सरकारचें” (जिल्ह्याचें) मुख्य ठिकाण होतें असा ऐने-ई-अकबरींत उल्लेख आहे. येथें पूर्वी उत्तम धोतरजोडे होत.
Comments
Post a Comment