बजाणा- मुंबई इलाखा

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें   

बजाणा-
 मुंबई इलाखा. काठेवाड पोलिटिकल एजन्सीमधील एक संस्थान. क्षेत्रफळ १८३ चौरस मैल लोकसंख्या (१९०१) १०२७९. या संस्थानचें १९०३-०४ सालांत उत्पन्न ७१००० रु. होतें. हें काठेवाडांत चवथ्या वर्गाचें संस्थान आहे. येथील जाट लोकांचें मूळ ठिकाण सिंधप्रांतांत वांग बाजार येथें होतें; पण तेथून हांकून लाविल्यामुळें त्यांनी मांडव डोंगरांतल्या पोवारांचा आश्रय धरला. जाट लोकांनीं चंपानेरच्या वेढयाच्या वेळीं चांगलें शौर्य गाजविल्यामुळें, सुलतानानें त्यांचा पुढारी मलिक हिदोजी याला २४ खेडीं दिलीं. मलिक इसाजी यानें रावमापासून वालिवडा व वाराहि घेतलें व तो तेथें कायम राहूं लागला. मलिक लाखा व मलिक हैदरखान हे अनुक्रमें सितापूर व बनोद येथें स्थायिक झाले.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे