मेदक, जि ल्हा.-हैद्राबाद संस्थानांतील एक जिल्हा

 मेदक, जि ल्हा.-हैद्राबाद संस्थानांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ८५६ चौरस मैल. या जिल्ह्यांत पुष्कळ लहान लहान टेंकड्या व दोन मोठे डोंगर आहेत; आणि यांतून मांजरा नदी वहाते. या जिल्ह्याचा बराच मोठा भाग अरण्यानें व्यापिला आहे. येथील हवापाणी निरोगी आहे. पाऊस सरासरी ३० इंच पडतो.

इतिहास:-पूर्वी मेदक जिल्हा वरंगळच्या राज्यांत मोडत असे. इ. स. १३०९ मध्यें अल्लाउद्दीनाच्या मलिक काफूर नामक सेनापतीनें वरंगळच्या राजाजवळून मेदक गांव घेतलें. नंतर चवदाव्या शतकांत हा जिल्हा ब्राह्मणी राज्यांत मोडूं लागला व नंतर गोवळकोंड्याच्या कुत्बशाही घराण्याकडे आला. गोवळकोंड्याचें राज्य जमीनदोस्त झाल्यावर हा जिल्हा मोंगल राज्यास जोडण्यांत आला; व पुढें १८ व्या शतकांत जेव्हां हैद्राबाद संस्थान निर्माण झालें तेव्हांपासून ह्याचा हैद्राबाद संस्थानांत अंतर्भाव होऊं लागला. पुराणवस्तुसंशोधनशास्त्राच्या दृष्टीनें या जिल्ह्यांत पुष्कळ महत्त्वाचीं ठिकाणें आहेत. मेदक किल्ला, पतनचेरु, अंदोल, कोमतूर येथील देवळें हीं त्या दृष्टीनें फार महत्त्वाचीं ठिकाणें आहेत.

या जिल्ह्यांत एकंदर ९५७ खेडीं व ४ शहरें असून लोकसंख्या (१९११) ६८७१३७ आहे. यांत तेलगु भाषा प्रचलित आहे. जिल्ह्यांत रयतवारी पद्धति चालू असून येथील जमिनींत मुख्यत: तांदूळ, बाजरी, ज्वारी, कोद्रु इत्यादि पिकें होतात. या जिल्ह्यांतील लिंगमपेठ मधील टेंकड्यांत लोखंड सांपडतें.

ता लु का.-क्षेत्रफळ ५६३ चौरस मैल व लोकसंख्या १२७१९२. या तालुक्यांत १६३ खेडीं आणि मेदक व लिंगमपेठ हीं दोन मोठीं गांवें आहेत. मेदक गांव हें या तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. हा तालुका डोंगराळ असून यांतील जमीन रेताड आहे. या जमिनींत भाताचें व उंसाचें पीक येतें.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे